मुंबई : राज्य शासनाने राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे गठण केले असून अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्रीहरी पी. डावरे यांची नियुक्ती केली आहे. गृह विभागाने या नियुक्तीच्या अनुषंगाने अधिसूचना जारी केली आहे.
प्राधिकरणाचे अध्यक्षांचे अधिकार, कार्ये, पदावधी आदी बाबी महाराष्ट्र पोलीस (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अधिनियम, 2014 मधील कलम 22 क्यू आणि 22 आर मधील तरतुदीनुसार असतील असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.