या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते.राज्यात तालुकास्तरावर डायलिसीस केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केली. पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढच्या वर्षी राज्यातल्या ३५६ तालुक्यात डायलिसीस केंद्र सुरू केली जातील अशी माहिती त्यांनी दिली. टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी महिनाभरात धर्मशाळा बांधली जाईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईत जलपर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनं, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम गतिमानतेनं सुरु आहे, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला आदित्य ठाकरे उत्तर देत होते.