Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भाजप खासदाराने जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सोलापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या खोट्या प्रमाणपत्राचा वापर करून महास्वामी यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय आणि आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने शासनाची फसवणूक केल्याचं दिसून आलं आहे.

त्यांनी सादर केलेलं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अमान्य केल्यानंतर अक्कलकोटच्या तहसीलदारांनी सोलापूरच्या न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरुन न्यायालयानं हा आदेश दिला.

Exit mobile version