Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दिल्लीतील शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सरकारनं दिल्लीतील सर्व सरकारी अनुदानित, खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि दिल्ली महानगरपालिका मंडळाच्या प्राथमिक शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या शाळा या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत बंद राहतील. कोरोना व्हायरस कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका ट्विटमधे म्हटलं आहे.

Exit mobile version