Site icon साप्ताहिक एकच ध्येय

१ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरातल्या सुमारे ६२०० प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधे दरवर्षी १ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा केला जातो. आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

काल, आठवड्यातल्या चौथ्या दिवशी देशातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘सुविधा से सम्मान’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम झाला.

सुमारे दोन हजार ठिकाणी, ५० हजारांहून अधिक, सुविधा सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटांचं स्त्रियांना निःशुल्क वितरण करण्यात आलं. प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेमधे, दर्जेदार औषधं लोकांना परवडणा-या किंमतीमधे उपलब्ध करुन दिली जातात.

Exit mobile version