Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातील बेकायदा पॅथॅालॉजींविरोधात कठोर कारवाई – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई :  राज्यातील बेकायदा पॅथॉलॉजींविरोधात आरोग्य विभागाच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी राज्यातील बेकायदा पॅथॅालॉजीविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते.

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट महाराष्ट्रात अद्याप लागू करण्यात आलेला नाही. हा कायदा राज्यात लागू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. बेकायदा लॅब प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय  आयुक्त यांना निर्देश दिले असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य विजय उर्फ भाई गिरकर आदींनी सहभाग घेतला.

Exit mobile version