नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला २०२८ च्या ऑलम्पिक स्पर्धेत पहिल्या १० राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवायचं आहे असा आशावाद केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केला. काल हरियाणा इथं भारत-तिबेट पोलीस दलाच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय पोलीस ऍथलेटिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
केंद्र सरकारनं १५ हजार युवा खेळाडूंची निवड करून त्यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या २८४ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिलं जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलीस दलांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल असंही ते म्हणाले.