Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ओझरचे अ. भा. नक्षत्र महाकाव्य संमेलन : कवी मंडळीसाठी नवीन उर्जा प्रदान करणारा ह्दय सोहळा

पुणे : ओझरच्या पावन भूमित आपण सर्व रसिक नक्षत्र उपस्थित राहून प्रभावीपणे काव्य सादरीकरण केले, नव्याने झालेल्या एकमेकांशी मैत्रीसोबत काव्याचा आनंद लुटला. एकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमपुर्वक संवाद साधत दोन दिवस विघ्नहर क्षेत्री मनापासून रमलात, शब्द बहरले, अंतरी भीडले, कृतीत उतरले अशी अवस्था येथील प्रत्येकांची झालेली होती, त्याबद्दल सर्व रसिक मित्रांचे कौतुक करतो.

अपरिचितांनाही आपला वाटावा असा हा नक्षत्राचं देणं काव्यमंचचा मोठा परिवार आहे. सर्वांना सामावून घेणारा आहे. या परिवारास वीस वर्षाचा अखंड काव्य चळवळीचा प्रवास आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्रजी सोनवणे हे  मुख्य शिलेदार आहे.

त्यांच्या नियोजनात सहावे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्य संमेलन ओझर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाले. केंद्रीय समितीच्या मार्गदर्शनात जुन्नर तालुकाच्यावतीने भक्तभवन सभागृहात नुकतेच पार पडले. या दोन दिवसांच्या महाकाव्य संमेलनात काव्य ग्रंथदिंडी, दोन परिसंवाद, नऊ काव्यमैफल, प्रकट मुलाखत अशा भरगच्च कार्यक्रमाने महाकाव्य संमेलन गाजले. शिवबाच्या शिवनेरीपर्यंत कवीनी म्हटलेली पोवाडा गीते जाऊन त्यांना वंदन करून आलीत.

महाकाव्य संमेलनाची सुरुवात अष्टविनायक श्री विघ्हनर गणपती  मंदिर ते भक्तभवन महाकाव्य संमेलन स्थळापर्यंत काव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. या काव्य ग्रंथदिंडीमध्ये श्री विघ्हनर विद्यालय, ओझर, जयहिंद इंजिनिअरींग कॉलेज विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. तसेच स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, महिला मंडळ,

ज्येष्ठ नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा ठरला. महाकाव्य संमेलनाध्यक्ष लोककवी डॉ.विठ्ठल वाघ, उदघाटक समाजभूषण जगन्नाथ कवडे, स्वागताध्यक्ष शिवनेरभूषण तात्यासाहेब गुंजाळ, नक्षञाचं देणं काव्यमंच राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे, जुन्नर तालुका अध्यक्ष अँड. जयराम तांबे, सुप्रसिदध उद्योजक संदीप नाईक, उद्योजक लक्ष्मीकांत कांजळे, अँड.प्रफुल्ल भुजबळ, सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, महाराष्ट्र समन्वयक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ पत्रकार जयवंत बामणे, बी.व्ही.मांडे, राजेंद्रकुमार शेळके, पियुष काळे, गणेश कवडे, मिलींद कवडे, शिरीष बो-हाडे, मंगेश शेळके, डॉ.बी.व्ही.राऊत, प्रकाश जगताप, शुभम नाईक, बी.आर.गाढवे, चंदुराम पाथोडे, संजीव शेरमकर, हेमंत रत्नपारखी, अँड.बाळासाहब तोरस्कर, प्रा.सुरेखा कटारिया, प्रभाकर ढोमसे, विनायक विधाटे, मनमोहन जालेपोलेल्लु, रजनी ताजणे, परशुराम नेहे, सचिन पाटील, आरती धारप, ज्योती शिंदे, सुनिल बिराजदार, सुभाष मोरे, मो.शकील जाफरी, राजेंद्र जोगळेकर, जगदीप वनशिव, अँड. राम कर्पे, रामदास घुंगटकर, अँड. सुधीर ढोबळे, मुख्या. विलास दांगट, कारभारी थोरात, केवलचंद सहारे, अरुण कांबळे, बाळासाहेब थोरात, किशोर कवडे, पांडुरंग कवडे, दशरथ मांडे, संतोष कवडे, भालुकाका जोशी, प्रदीप वैराळ, गणेश डबडे, रोशन सोनवणे, सोमनाथ घोडे, अँड.प्रवीण वैराळ, गजानन सोनवणे, महेंद्र थोरवे, संपत गायकवाड, निखील मांडे, परवेश चौधरी, मैलारीराज कावळे, नितीन लोणारी, बाबामियाँ शैख, विजय कांबळे, अतुल परदेशी, सचिन ठाकुर, ज्ञानेश्वर मडके, प्रविण कोईडकर, जितेंद्र मोरे, सदानंद उर्कीडे, प्रीतम फुलपगार, हिरामण माळवे, सागर सोनवणे, ताईबाई सोनवणे, अनिल डबडे, हरिप्रसाद देवकल, अनिल बनकर, राजु मोरे, शिवनाथ गायकवाड, सतिश कांबळे तसेच आलेल्या कवी कवयिञीं अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.

पर्यावरण संदेश देत वृक्ष पुजा करुन व पाणी घालून आगळ्यावेगळ्या पध्दतीने महाकाव्य संमेलनाचे उदघाटन जगन्नाथ कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे सहावे महाकाव्य संमेलन असल्यामुळे सहा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यात कविवर्य मोहन जोंधळेगुरुजी “बहुरंगी काव्यसुमने “(काव्यसंग्रह) सोलापूर, कविवर्या सौ.सुजाता शिंदे “प्रतिबिंब “(काव्यसंग्रह) बारामती, कवी वादळकार “वादळाचे घोगांवणे” (चारोळीसंग्रह) शिरोली बुद्रुक, पुणे, कविवर्य अँड.राम कर्पे “आशियाना” (काव्यसंग्रह) जुन्नर, कविवर्य जितेंद्र देशपांडे “भाव अंतरीचे (काव्यसंग्रह) बैंगलोर, कविवर्या किरणताई मोरे “मधुगंध” (काव्यसंग्रह) गोंदिया तसेच महाकाव्य संमेलन स्मरणिका “काव्यातील नक्षञ” प्रकाशन डॉ.विठठल वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उदघाटक  जगन्नाथ कवडे म्हणाले की, “माझ्या जुन्नर तालुक्यात, शिवरायांच्या जन्मभूमीत, अष्टविनायक गणपती श्री विघ्हनर गणपतीच्या सानिध्यात हा सोहळा संपन्न होत आहे. आपण आयुष्यात पैसे किती कमविले. त्यापेक्षा आपण किती माणसे कमविली हे महत्वाचे आहे. कविंच्या विकासासाठी ध्यास घेतलेला का काव्यमंच आहे. भविष्यातील कवी लेखक ह्या व्यासपीठातुनच घडणार आहे.”

स्वागताध्यक्ष श्री. तात्यासाहेब गुंजाळ म्हणाले की, “नक्षञाचं देणं काव्यमंचचा प्रवास हा मराठी मनाला अभिमान वाटावा असाच आहे. कवी मनाची हि हळवी आणि मृदू माणसे ख-या अर्थाने माणुसकी जपणारी माणसे आहे. गुणीजनांना एका व्यासपीठावर आणुन त्यांचा आदर करुन त्यांना प्रोत्साहन देणारी एक सामाजिक संस्था आहे.”

महाकाव्य संमेलन अध्यक्ष लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी तर सर्वांना जिंकून घेतले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते  म्हणाले की, “कवी हा सृष्टीचा निर्माता, समाजाचा मार्गदर्शक असतो. प्रत्येक कवीची सृष्टी, विश्व हे वेगवेगळे असते. आज आपल्यातील काही लोक सशक्त कविता लिहितात. जी मराठी कवितेचे दालन समृध्द करते. लौकिक वाढवते. कवितेत ताल, लय, वृत्त, छंद यांचा अभाव नसावा. प्रतीक, प्रतिमा यातून आलेली सूचकता हेच कवितेचे प्राणत्व असते.”

कवीच्या कार्याचा सन्मान व्हावा, त्यांना बोलते करावे, राज्यस्तरीय विचारपीठ उपलब्ध व्हावे, याकरिता हा काव्यमंच सातत्याने काम करित राहिल.

Exit mobile version