नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्रालयाने ‘कोविद-१९ व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरची प्रशिक्षण कार्यशाळा आज आयोजित केली आहे. सर्व राज्यातल्या आणि इतर मंत्रालयाच्या अाखत्यारीतल्या रुग्णालयांसाठी ही कार्यशाळा नवी दिल्लीत होत आहे.
रुग्णालयातील सज्जता, विना औषध, हस्तक्षेप, संसर्ग रोखणे यासाठी घेण्याची खबरदारी, हवामानाची स्वच्छता, इत्यादी गोष्टीचे प्रशिक्षण, प्रशिक्षकांना दिले जाणार आहे. त्यानंतर अशाप्रकारच्या कार्यशाळा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.