नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, नियोजित भारत-युरोपीय संघाची शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यात बदल करायाचा निर्णय घेण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी नवी दिल्ली इथे बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. इराणमध्ये एकाही भारतीयाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं निष्पन्न झाले नाही, असेही ते म्हणाले.
बंग बंधु शेख मुझीबूर रहमान याच्या जन्म शताब्दी समारंभाचे बांगला देशाच्या, प्रधानमंत्री शेख हसीना यांनी दिलेले आमंत्रण प्रधानमंत्र्यांनी स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीत झालेल्या हिंसाचारासंबंधीच्या प्रश्नावर रवीशकुमार म्हणाले की, दिल्लीमधली परिस्थिती झपाट्याने निवळण्यासाठी पोलीस प्रशासन योग्य कार्यवाही करत आहे. अफगाणिस्तानच्या सर्वांगीण विकासाकरता भारताचा पाठींबा असल्याचे रविश कुमार यांनी सांगितले.