Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माहुलमधील प्रदुषणग्रस्त भागातील कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप

मुंबई : माहुल येथील प्रदुषणग्रस्त भागातील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांना घरे देण्याचा निर्णय पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे. आज काही कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

नर्वसन करण्याबाबत पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या पुढाकारातून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही दिवसांपुर्वी बैठक झाली होती. या पुनर्वसनासाठी सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेली 300 घरे मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, तसेच मुंबई महापालिकेने या घरांमध्ये अतिप्रदुषीत भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अवघ्या काही दिवसात अंमलबजावणी होऊन आज प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात प्रातिनिधीक स्वरुपात कुटुंबांना मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरीत कुटुंबांना तातडीने आज किंवा उद्यापर्यंत चाव्या सुपूर्द कराव्यात, अशा सूचना मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे आणि अति प्रदुषीत भागातील घरांचे पुनर्वसन करणे.

Exit mobile version