१३ मार्चपर्यंत नाम निर्देशनपत्रं भरता येतील. यासाठी उमेदवारानं जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असल्याचं जिल्हा निवडणूक प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होणार असून ३० मार्चला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातल्या १ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे दोन लाख हेक्टहरवरील पिकं उद्धवस्त झाली.
अमरावती विभागीय महसूल कार्यालयात, जिल्हा परिषदेची मध्यवर्ती इमारत आणि महानगरपालिकेची नवी इमारत, यासोबतच भातकुली, अमरावती, चिखलदरा, धारणी आणि दर्यापूरच्या तहसील कार्यालय इमारतींसाठी अर्थसंकल्पात एकूण ३६३ कोटी ८५ लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.