Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘सत्तर साल आझादी, याद करो कुर्बानी’-देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली : देशातल्या प्रादेशिक भाषांतल्या चित्रपटांना प्रोत्साहन देऊन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय विशेष प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत दिली.

12 ते 18 ऑगस्ट 2016 दरम्यान, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत, संरक्षण मंत्रालयासोबत ’70 साल आझादी, याद करो कुर्बानी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे जावडेकर यांनी सांगितले.

दरवर्षी देशात होणाऱ्या इफ्फी आणि मिफ सारख्या चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपट तसेच लघुपट मोठ्या प्रमाणात दाखवले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, त्याशिवाय ब्रिक्स संमेलनातही प्रादेशिक चित्रपट दाखवले जातात. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सरकारतर्फे चित्रपटांना अर्थसहाय्य केले जाते, असे जावडेकर म्हणाले.

Exit mobile version