नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत अलिकडेच झालेल्या हिंसेच्या घटनांचं वार्तांकन करताना मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल केरळमधल्या एशिया नेट न्यूज टीव्ही आणि मीडीया वन या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात आली आहे.
दोन्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेतला.