Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ब्रिटनच्या न्यायालयाने निरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी निरव मोदी याचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयाने काल फेटाळला. मोदी याचा जामीन अर्ज फेटाळला जाण्याची ही पाचवी वेळ होती.

निरव मोदी सध्या लंडनमध्ये वँडर्सवर्थ कारागृहात कैदेत आहे. मोदी याला मागच्या वर्षी मार्च महिन्यात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरोधात येत्या ११ मे पासून प्रत्यार्पणासंदर्भातल्या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.

दरम्यान निरव मोदी यांच्या मुंबईतली चारपैकी तीन मालमत्ता मुंबई महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. निरव मोदीने साडे नऊ कोटींचा मालमत्ता कर चुकवल्यामुळे महानगरापालिकेने ही कारवाई केली आहे.

या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सक्तवसुली संचालनालयाने याआधीचे सुरु केली आहे. ३ वाणिज्यिक आणि १ रहिवासी सकूंलाचा यात समावेश आहे.

हा थकीत मालमत्ता कर भरण्याची लेखी विनंती मुंबई महानगपालिकेने सक्तवसुली संचालनालयाला केली आहे. लोअर परेल इथे एक आणि कुर्ला इथे दोन वाणिज्यिक संकूल आणि कालिना इथे एक रहिवाशी संकूल आहे.

Exit mobile version