Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तारिक जासारेविक यांनी सांगितले.

एकूण १ लाख १ हजार ८२७ रुग्ण आढळले, त्यातले ३ हजार ४८४ दगावले. संघटनेचे अध्यक्ष टेडॉस अधानोम घेब्रेसस यांनी सांगितले की चीन बाहेर हा आजार १७ पट वेगाने फैलावला आहे.

काही देश कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेत नसल्याचे निरीक्षण नोंदवून त्यांनी आवाहन केले, की या संकटाशी सामना करण्यासाठी सर्व देशांनी सज्ज व्हावे.

Exit mobile version