Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनमध्ये हॉटेलची इमारत कोसळून ४ ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या फुजियान प्रांतातल्या क्वांझोऊ शहरात एका हॉटेलची इमारत कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले.

ढिगाऱ्याखाली ७१ जण अडकल्याची भीती असून ४२ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात यश मिळालं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था या हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

अधिकृत सूत्रांनी सांगितलं की इमारतीत अंतर्गत रचनेत बदल करण्याचं काम चालू असताना हा अपघात झाला.

Exit mobile version