नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका वाढत असून किलाँग इथं आज ७ पूर्णांक २ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.
कुलु जिल्ह्यात मनाली इथं, पारा १ पूर्णांक २ अंश सेल्सिअस इतका तर किन्नौरा जिल्ह्यातल्या कल्पा इथं शून्य पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतका खाली आला आहे.
कुफ्री इथं २ अंश, डलहौसी इथं दोन पूर्णांक पाच अंश तर शिमला इथं ५ पूर्णांक ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.