नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये ४०० संशयितांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. जम्मू शहरात सातवरी आणि सरवाल भागात या संशयितांवर लक्ष ठेवलं जात आहे.
खबरदारी म्हणून येत्या ३१ मार्च पर्यंत जम्मू- काश्मीरमधली सर्व अंगणवाडी केंद्रं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मात्र जम्मू मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, असं सरकारी प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे.