नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
ते काल हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. ज्या देशातल्या महिलांना महिलांना समान संधी नाकारल्या जातात, आणि पिछाडीवर ठेवलं जातं असे देश प्रगती करू शकत नाहीत असंही नायडू यावेळी म्हणाले.
कोणतीही मुलगी शाळेत जाण्यापासून पर्यायाने शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पाहणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचंही ते यावेळी म्हणाले.