Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या 130व्या स्थापन दिनानिमित्त ‘जालियाँवाला बाग’ विषयावरच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रल्हाद सिंग पटेल 11 मार्च 2020 रोजी करणार

प्रदर्शन 30 एप्रिल 2020 पर्यंत जनतेसाठी खुले राहणार

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या (NAI) 130व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन (स्वतंत्र कार्यभार) मंत्री प्रल्हाद सिंग पटेल ‘जालियाँवाला बाग’ या प्रदर्शनाचे उद्‌घाटन 11 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता करणार आहेत.

नवी दिल्ली इथल्या भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या इमारतीत होणाऱ्या या प्रदर्शनात ‘जालियाँवाला बाग’ हत्याकांडा विषयीची मूळ कागदपत्रं तसेच डिजिटल प्रती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ‘जालियाँवाला बाग’ हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात भारतीयांनी केलेल्या अथक प्रयत्नांवर या प्रदर्शनात प्रकाश टाकला जाईल.

11 मार्च रोजी अभिलेखागाराच्या इमारतीत सकाळी 11 वाजता याच विषयावर किश्वर देसाई यांचे भाषण होणार आहे.

Exit mobile version