Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं.

वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या लष्करी विमानानं त्यांना भारतात परत आणलं आहे. इराणला कोरोनाचा जबर तडाखा बसला आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इराणमधला भारतीय दूतावास, भारतीय हवाईदल तसंच तिथल्या वैद्यकीय पथकाचे आणि इराणमधल्या अधिका-यांचे आभार मानले आहेत.

इराणमध्ये अडकलेल्या इतर भारतीयांना मायदेशी आणण्याकरता सरकार प्रयत्न करत आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं. इराणला १४ अधिकारी आणि चार वैद्यकीय कर्मचारी पाठवल्याचं भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर करण कपूर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.

Exit mobile version