Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मेरी कोमसह तीन भारतीय मुष्टियोद्ध्यांचा टोकियो ऑलिंपिकसाठीचा प्रवेश निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय मुष्टियोद्धा अमित पांघल हा ५२ किलो वजनी गटात पहिल्यावहिल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तर ६३ किलो वजनी गटात मनिष कौशिक काल अम्मान इथं आशिया ओशियानिया पात्रता स्पर्धेत पराभूत झाल्यानंतरही टोकियोसाठी तिकीटाच्या स्पर्धेत आहे.

जागतिक रौप्यपदक विजेता अमित पांघलनं फिलिपाईन्सच्या कार्लो पालम याला ४-१ नं हरवून बाहेर काढलं. आणखी एका निकराच्या झुंजीत कांस्यपदक विजेता कौशिकला मंगोलियाचा तिसरा मानांकित शिनझोंग बातारसुख याच्याकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.

Exit mobile version