नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारचा पैसा खर्च करण्यास एमआयएमनं विरोध केला आहे. या स्मारकांसाठी राज्य सरकारचा निधी खर्च होणार असेल त्या विरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
औरंगाबादमध्ये ही स्मारकं निर्माण करण्यासाठी १०० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. हा पैसा स्मारकांसाठी खर्च करण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा जिल्हा परिषद शाळांच्या सुधारणेसाठी खर्च करावा, अशी मागणी त्यांनी केली.