मुंबई : शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारंसघात आढळराव यांचा पराभव झाला. तरी पक्षाने त्यांना उपनेतेपद देऊन संघटनेतील मान कायम ठेवला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या वेळी आढळराव यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे इतर नेते या वेळी उपस्थित होते.