नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून नाशिक जिल्हयातल्या इगतपुरी इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल, असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. कोरोनासंदर्भात भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
कोरोनाबाबत राज्य सरकारनं पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. मात्र गर्दीची ठिकाणं टाळावीत, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनासाठी मास्क आणि सॅनिटायझर यांचा कृत्रिम तुटवडा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.