नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काल दुस-यांदा पदाची शपथ घेतली. मात्र त्यांचे विरोधक अब्दुल्लाह-अब्दुल्लाह समांतरपणे सत्ता स्थापन केली असून, तालिबानबरोबर होणा-या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर देशाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
घनी यांच्या शपथविधीत विदेशी व्यक्ती, राजनैतिक अधिकारी, वरिष्ठ राजकीय नेते तसंच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमधे झालेल्या निवडणुकीत घनी यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. मात्र अब्दुल्लाह- अब्दुल्ला यांनी या निकालावर आक्षेप घेत स्वतःचा वेगळा शपथविधी समांतरपणे घेतला आहे.