मुंबई : बुलढाणा येथील मामुलवाढी ग्रामपंचात अंतर्गत असलेल्या मौजे धाडी गावचा हिंगणे गव्हाण १३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करून संबंधित समस्या सोडविण्यात येतील. क्षारयुक्त पाण्यासाठी आरओ प्लांट लावण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलावबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.
मामुलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मौ.धाडी गावाचा हिंगणे गव्हाण १३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याबाबत सदस्य राजेश एकडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, मामुलवाडी ग्रामपंचायतमध्ये आलेल्या मौ. धाडी गावाचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात येत आहे. दोन किलोमीटरची पाईपलाईन देण्यात येणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. क्षारयुक्त पाणी असल्याने तात्काळ आरओ प्लांटही लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.पाटील यांनी दिली.