नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचं स्वागत केलं. शिंदे यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
शिंदे हे पक्षात मुख्यप्रवाहातले नेते म्हणून काम करतील, असं नड्डा यांनी सांगितलं. यावेळी शिंदे म्हणाले की, देशाचं भविष्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे आणित्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आपण उत्सुक आहोत.
मध्य प्रदेशात झालेल्या मोठया राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रातसुद्घा उमटतील,अशी प्रतिक्रिया केंद्रियमंत्री रामदास आठवले यांनी दिली. महाराष्ट्रातही सत्तेसाठी काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्याची चूक केली.त्याचा परिणाम त्यांना मध्यप्रदेशमध्ये भोगावा लागत आहे,असं आठवले म्हणाले.