नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मागे घेतलं. गैरवर्तनाबद्दल गौरव गोगोई, टी एन प्रथपन, डीन कुरिआकोसे, मानिकाम टागोर,गुरजित सिंग औजला, राजमोहन उन्निथन आणि बेन्नी बेहनन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
सदनाची कारवाई सुरु झाल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. चर्चे दरम्यान काँग्रेसनेते अधिररंजन चौधरी यांनी निलंबन मागे घ्या, अशी मागणी केली. चर्चेनंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ठराव मांडला. तो सभागृहानं मंजूर केला.