Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निष कौशिक टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कांस्यपदक विजेता मनिष कौशिक हा ६३ किलो वजनी गटात टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला आहे. जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई पात्रता सामन्यात आज त्याने राष्ट्रकूल स्पर्धा विजेता, ऑस्टेलियाच्या हॅरिसन गार्साईडला पराभूत करुन आपलं ऑलिंपिकसाठीचं स्थान निश्चित केलं.

त्यापूर्वी ६९ किलो वजनी गटात डोळ्याच्या दुखापतीमुळे राष्ट्रकूल स्पर्धा विजेता विकास कृष्णन याला माघार घ्यावी लागली.

ऑलिंपिक स्पर्धांसाठी एम.सी मेरी कोम, सिमरनजित कौर, लोव्हलिना बोर्गोहॅन, पूजा रानी, अमित पांघल, आशिष कुमार आणि सतीश कुमार हे इतर भारतीय मुष्टीयोध्दे पात्र ठरले आहेत.
Exit mobile version