मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी, राज्य शासनानं एक आठवड्यानं कमी केला आहे.
२४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेलं अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं, पण ते आता येत्या शनिवारी १४ तारखेलाच संस्थगित होईल अशी घोषणा, विधीमंडळ कार्यमंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत केली.
याबाबत विधीमंडळात मांडलेला प्रस्ताव, सदस्यांनी पारित केला असं त्यांनी सांगितलं. विधिमंडळ सदस्यांचं वेतन वाढवण्यासंदर्भातलं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. या विधेयकाअंतर्गत आमदारांच्या थेट वेतनवाढ नसून त्यांच्या वाहन चालकांसाठी दरमहा १५ हजार रुपये वेतनवाढीची तरतूद आहे.