नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन डॉलर्सची जगभरातली बाजार उपलब्धता लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांच्या कालावधीसाठी परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री जाहीर केली आहे.
त्यानुसार सोमवारी रिझर्व्ह बँकेतर्फे दोन अब्ज मूल्याच्या अमेरिकन डॉलर्सचे विक्री व्यवहार करण्यात येणार आहेत. कोविड-19 च्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येतील.
६ मार्च रोजी देशाच्या परकीय चलन साठ्यात ४८७ अब्ज २४ कोटींचे डॉलर्स असून, कोणत्याही आकस्मिक संकटासाठी आपण सज्ज असल्याचं आरबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.