पिंपरी : महापालिकेतर्फे इमारती, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता केलेल्या दिवाबत्तीसाठी 3 फेज 440 व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब आणि यंत्रणेशी छेडछाड करू नये, खांबाला आणि फिडर पिलरला स्पर्श करू नये. जनावरे विद्युत दिव्यांच्या खांबाला बांधू नयेत.जंक्शन बॉक्सवर पाय ठेवून खांबावर चढू नये. कपडे वाळवण्याकरिता तारा पोलला बांधू नये, बांधकामामध्ये पोल घेऊ नये. फ्लेक्स, होर्डिंग बांधू नये, असे आवाहन महापालिकेच्या विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी केले आहे.
महानगरपालिकेतर्फे महापालिका इमारती, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेमार्फत आवश्यकतेप्रमाणे करण्यात येते.
इमारत व दिवाबत्तीच्या खांबामधून महापालिकेकडून दिवाबत्तीसाठी 3 फेज 440 व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. त्यामुळे नागरीकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब व यंत्रणेची छेडछाड करू नये, खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करू नये अथवा विनापरवाना विद्युत पुरवठा घेऊ नये, जनावरे विद्युत दिव्यांच्या खांबला बांधू नयेत. जंक्शन बॉक्सवर पाय ठेवून खांबावर चढू नये, कपडे वाळवण्याकरिता तारा पोलला बांधु नये, बांधकामामध्ये पोल घेऊ नये. फ्लेक्स, होडिंग बांधू नये, तसेच पोलच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
कुठल्याही प्रकारची केबल/तार खांबावरून ओढू नये. अशा प्रकारच्या कृत्यामुळे संबधित नागरिकांचे जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्त व जीवितहानी झाल्यास महापालिका अशा दुर्दैवी घटनेस जबाबदार राहणार नाही, असे महापालिका विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.