नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वार्षिक आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिला जाणारा वैद्यकीय भत्ता, राज्य शासनानं वार्षिक ५०० रुपयांवरून अडीच हजार रुपये इतका वाढवला आहे.
पोलीस विभागाबाबत शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली.
या वार्षिक आरोग्य तपासणीत, १२ मुलभूत वैद्यकीय चाचण्या असतील. हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदांपर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेशही, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्याबाबत सरकार विचार करत आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.