नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुक्कुट उद्योग उत्पादनांचा कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावाशी काहीही संबंध नसल्याचं वाशिमचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी म्हटलं आहे.
कोंबडीचं मांस आणि अंडी मानवी आहारासाठी सुरक्षित असल्याचं त्यांनी यासंदर्भात पसरत असलेल्या अफवांचं निराकरण करण्यासाठी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
मका तसंच सोयाबीन उत्पादक शेतकरीही कुक्कुटपालन व्यवसायाशी सलंग्न असल्यानं या अफवांचा या सगळ्यांच्या व्यवसायांवर नकारात्मक परिणाम होत असल्यानं अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही वानखडे यांनी केलं आहे.