Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधूचा प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या पी व्ही सिंधू हिनं बर्मिंहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुने काल झालेल्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यून हिचा २१-१९, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चौथ्या मानांकित नोझोमी ओकुहारा हिच्यासोबत होणार आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत असलले इतर सर्व खेळाडू पराभूत झाल्याने, आता केवळ सिंधुच्या रुपातच भारताचे स्पर्धेतले आव्हान टिकलेले आहे.

Exit mobile version