नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या कोर्टाने कुलदीपसिंग सेंगरला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. दिल्लीतील कोर्टाने कुलदीप सेंगर याचा भाऊ कुलदीपसिंग सेंगर यांना बलात्कार पीडितेच्या कुटूंबाला प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे आदेश दिले.
2017 मध्ये एका मुलीवर बलात्काराच्या एका प्रकरणात, सेंंगरला गेल्या वर्षी 20 डिसेंबरला “नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत तुरूंगात रहाण्याची” शिक्षा सुनावण्यात आली होती. खून करण्याच्या प्रकरणी कोर्टाने 4 मार्चला सेंगर व इतर सात जणांना दोषी ठरवले होते आणि पीडितेच्या वडिलांचा खून करण्याचा त्यांचा हेतू नसल्याचे नमूद केले होते.