Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातल्या यात्रा, धार्मिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या यात्रा, सामुदायिक धार्मिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्याचे आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

कोरोना प्रतिबंधाचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी काल व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांशी संवाद साधला, त्यावेळी हे निर्देश दिले. प्रत्येक शहरातल्या पर्यटन कंपन्यांना, पुढचे काही दिवस नोंदणी न करण्याच्या सूचना जारी करण्याचे निर्देशही, त्यांनी यावेळी दिले.

Exit mobile version