नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासोबत दूरध्वनीवरून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हवामान बदलाच्या समस्येवरही चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान जॉन्सन यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचे प्रमाण वाढवण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उभय देशांमधले द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्धताही व्यक्त केली. चर्चे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांना भारत भेटीवर येण्याचे निमंत्रणही दिले.