नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य पुरवण्यासाठी देशात नोवेल कोरोना विषाणूला सूचित आपत्ती म्हणून जाहीर करणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य आजार जाहीर केला आहे.
कोरोनामुळे रुग्णाचा किंवा बचावात्मक उपायांशी संबंधित व्यक्तींचा मृत्यू झाल्यास मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत देणार असल्याचं मंत्रालयानं, राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. कोविड-19 च्या उपचारांसाठी राज्य सरकारनं आखून दिलेले दरच लागू होतील, तसंच आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च केला जाणार आहे.