Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मांडवा बंदराजवळ प्रवासी बोट उलटली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या मांडवा बंदराजवळ एक प्रवासी बोट उलटली. मात्र या बोटीतल्या  खलाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

मुंबईहुन मांडवाच्या दिशेन ८८ प्रवाशांना घेऊन निघालेली ही बोट मांडवा बंदराजवळ एका खडकाला आदळली आणि बोटीत पाणी शिरू लागलं.

त्यानंतर खलाशांनीं सागरी पोलिसांना आणि अन्य संस्थांशी संपर्क साधला असता त्वरित बचाव अभियान राबवून या प्रवाशांना सुखरूप दुसऱ्या बोटींमध्ये हलवण्यात आलं.

बुडणा-या बोटीतील ८८ जणांना वाचवणा-या रायगड पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातल्या जवानांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आल्याचं ते म्हणाले.

Exit mobile version