Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गोव्यात शैक्षणिक संस्था,कासिनो चित्रपटगृहे क्रूझ, जिम, स्पा, बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोव्यात १६ ते ३१ मार्चदरम्यान सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत. राज्यातले सर्व कासिनो, सार्वजनिक जलतरण तलाव, चित्रपटगृहे क्रूझ, जिम, स्पा, पब आणि कल्ब देखील 31 मार्चपर्यंत बंद राहणार, असल्याचं सावंत यांनी सांगितले.

रविवारी मध्य रात्रीपासून हा निर्णय लागू होईल.

Exit mobile version