नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ.फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्याच्या निर्णयाचे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी स्वागत केले. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इतर दोन माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला आणि मोहबूबा मुफ्ती यांचीही सरकारने मुक्तता करावी अशी मागणी स्टालिन यांनी केली आहे.