Site icon साप्ताहिक एकच ध्येय

२०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला येत्या एक एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. हा टप्पा ३० सप्टेंबर २०२०पर्यंत सुरू राहील.

जनगणनेचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी ९ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या टप्प्यात देशभरात सर्वत्र एकाच वेळी प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाईल.

जनगणनेची ही प्रक्रिया दर दहा वर्षांनी राबवली जाते.

यावेळच्या जनगणेदरम्यान घरांची सूची तयार करताना, नागरिकांच्या इतर माहितीसोबतच, त्यांचा मोबाईल क्रमांक, शौचलयाची उपलब्धता, दूरचित्रवाणी संच, इंटरनेट, मालकिची वाहने, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि स्रोत, मल-जल निःसारण सोयीची उपलब्धता, स्वयंपाकासाठी प्रामुख्याने वापरले जाणारे इंधन, तसेच नैसर्गिक पेट्रोलिअम वायु इंधनाची जोडणी, यांसदर्भातले प्रश्नही विचारले जाणार आहेत.

या प्रक्रियेदरम्यान घेतलेल्या मोबाईल क्रमांकांचा वापर केवळ जनगणनेसंदर्भतल्या संवादाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी केला जाणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

यावेळी पहिल्यांदाच जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे.
Exit mobile version