Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘कोविड-एकोणीस’ संबधी प्रधानमंत्री सार्क राष्ट्रप्रमुखांशी व्हिडियो कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोविड-एकोणीस’ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्क राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील.

सार्कच्या नेतृत्त्वाखाली देशांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा, तसंच सा-या जगाला दक्षिण आशियाने एक वस्तुपाठ द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कारण जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या या भागात आहे, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

Exit mobile version