Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १०७ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुची लागण झालेले आणखी २३ रूग्ण आज आढळल्याने संपूर्ण देशभरात लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०७ वर गेली आहे. नव्या रूग्णांपैकी कोरोनाबाधित १७ रूग्ण महाराष्ट्रातले असून ३ केरळचे तर २ तेलंगणचे आहेत.

राजस्थानमध्ये एक जण आढळला आहे. लागण निश्चित झाल्याच्या रुग्णांपैकी ९ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले तर दोघांचा मृत्यू झाला.

नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना विशेष सचिव संजीव कुमार यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांसाठी सरकारने पहिली आणि दुसरी चाचणी मोफत केली आहे.

नवी दिल्लीच्या एम्समध्ये ९९७१८७६५९१ ही समर्पित आणि चोवीस तास चालणारी हेल्पलाईन सुरू केली असून ती डॉक्टरांकडून चालवली जाईल.

Exit mobile version