नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोविड-एकोणीस’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या ३७ सीमारेषांपैकी १८ मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून रस्त्यांवरुन येणा-या प्रवाशांची वाहतूक आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल.
बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमा बरोबरच्या सीमारेषेवरुन काही विशिष्ट तपासणी नाके वगळता कालपासूनच प्रवेशबंदी लागू झाली आहे.
‘कोविड-एकोणीस’च्या चाचण्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या नाक्यांवरुनच प्रवाश्यांना जा-ये करता येईल. मात्र भूतान आणि बांगलादेशमधल्या नागरिकांची व्हिसामुक्त जा-ये पूर्वीप्रमाणेच चालू राहील.