रायगड : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली भाऊचा धक्का ते मांडवा रो- पॅक्स बोटसेवा आज पासून सुरु झाली असून या रो-रो बोटसेवेचे उद्घाटन मेरीटाईम बोर्डाचे सी.ई.ओ.डॉ.एन.रामा.स्वामी याच्याहस्ते संप्पन झाले.
भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान ही रो-रो बोट सेवा चालणार असून या बोटीतून बस,कार,बाईक व अन्य वाहने आणता येणार असून तासाभरातच अलिबागला पोहचता येणार आहे. प्रवाशांसह पर्यटकांची मोठी सोय होणार असल्याने रायगडच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या बोटीतून एकावेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची क्षमता आहे. भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा हे 125 कि.मी.अंतर रस्त्याने येण्यासाठी किमान तीन ते चार तासांचा वेळ लागतो. मात्र रो-रो सेवा सुरु झाल्यामुळे केवळ एका तासातच निसर्गरम्य मांडवा गाठता येणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो-पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत करण्यात आले आहे . केंद्र शासनाची सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून 50 – 50 टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मेरीटाईम बोर्ड,पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच मांडवा परिसरातील नागरिक उपस्थित होते.