नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रभावित इराणमधून २३६ भारतीयांची सुटका करण्यात आली असून, त्यांना राजस्थानात जैसलमीर इथे लष्कराच्या आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
तिथं ते चौदा दिवस राहतील. सेनादलाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितलं, की त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, असं इराणमधे केलेल्या तपासणीत आढळलं होतं.
या केंद्रात विलगीकरणाच्या काळात लागणा-या अद्ययावत सुविधा उपलब्ध असून, तज्ञ डॉक्टर तैनात आहेत. याखेरीज जोधपूरमधेही आरोग्य केंद्र सुरु करण्यात आलं आहे.